आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलू आत्महत्या:हातगाड्यावरून भाजी खरेदी केल्याने पत्नीची आत्महत्या, सेलूतील धक्कादाय प्रकार

सेलू3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोना विषाणुच्या भितीतून हा प्रकार घडला असल्याची शहरात चर्चा

एका हातगाड्यावरुन भाजी-पाला खरेदी केल्यामुळे रागाच्या भरात पत्नी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सेलू शहरात घडली आहे. 

सेलू शहरातील पारिजात कॉलनीतील रहिवाशी असलेल्या एका विवाहितेने पतीने परिसरात आलेल्या हातगाड्यावरून भाजीपाला घेतल्यामुळे रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी(दि.10) सकाळी साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान हा प्रकार घडला. किरण रोहित अग्रवाल(वय 36) असे य विवाहितेचे नाव आहे.

सेलू बसस्थानक परिसरातील स्टार कॉम्प्लेक्स मध्ये रोहित अग्रवाल यांचे शाम सूपर शॉपी हे दुकान आहे व त्यांचे कुटूंबीय पारिजात कॉलनीत वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांची पत्नी किरणने त्यांना भाजीपाला बाजारातून आणण्यास सांगितले होते. परंतू त्यांनी भाजीपाला बाजारातून न आणता रस्त्यावरील हातगाड्यावरून खरेदी केला होता. या शुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद उद्भवला. त्यातूनच रागाच्या भरात पत्नी किरणने राहत्या घरातून गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात सासू-सासरे, पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून पोलिस जमादार उमेश बारहाते अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणुच्या भितीतून हा प्रकार घडला असल्याची चर्चा शहरासह घटनास्थळी होती.

बातम्या आणखी आहेत...