आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:गुडघेदुखीवर इंजेक्शन देताच काही तासांत महिलेचा मृत्यू

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा वर्षांपासून गुडघेदुखीने त्रस्त महिला शहरात उपचारासाठी आल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू करून इंजेक्शन देताच काही तासांत तिचा मृत्यू झाला. शीतल पद्मभूषण शिंदे (३३) असे तिचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

मूळ पाथरी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील शीतल यांना मागील दहा वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होता. अनेक ठिकाणी उपचार घेऊनही वेदना कमी हाेत नव्हत्या. नात्यातील एकाने त्यांना शहरातील रिज्युव्हेन स्पाइन अँड स्किन क्लिनिकमध्ये दाखवण्याचा सल्ला दिला. पतीसह त्या बुधवारी शहरात आल्या. दिवसभर फिरून त्यांनी सिद्धार्थ उद्यानात काही वेळ घालवला. त्यानंतर सायंकाळी रुग्णालयात गेल्या.

तेथे डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर काही तासांनी अचानक त्यांची प्रकृती बिघडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी डॉक्टरांवर आराेप करत जवाहरनगर ठाण्यात तक्रार दिली. घटनेत निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक एन.जे. गायके यांनी कुटुंबाची तक्रार स्वीकारली. तक्रारीनुसार मेडिकल बोर्डाकडून चौकशी केली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई हाेईल, असे निरीक्षक पाटील म्हणाले. दरम्यान, डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

बातम्या आणखी आहेत...