आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईची मागणी‎:वडजी येथील महिलेची‎ रस्त्यात झाली प्रसूती‎, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर  हलगर्जीपणाचा आरोप

वैजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर तालुक्यातील वडजी येथील‎ महिला रिजवाना शाकीर पठाण या‎ महिलेला रविवारी पहाटे पाच‎ वाजता प्रसूती कळा येत असल्याने‎ लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य‎ केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र‎ वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात‎ बारा तासांनंतर नॉर्मल प्रसूती होणार‎ नसल्याचे सांगण्यात येऊन छत्रपती‎ संभाजीनगरला पाठवण्यात आल्याने‎ महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली.

या‎ घटनेत बाळ-बाळंतीण सुखरूप‎ असले तरी प्रशासनाच्या‎ हलगर्जीपणाबद्दल नातेवाइकांनी‎ संताप व्यक्त केला आहे. या‎ घटनेची अधिक माहिती अशी की,‎ लोणी खुर्द येथील गर्भवती महिला‎ रिजवाना पठाण यांना रविवारी (30‎ एप्रिल) पहाटे प्रसव वेदना सुरू‎ झाल्याने त्यांना तातडीने लोणी खुर्द‎ येथील आरोग्य केंद्रातून वैजापूरच्या‎ उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.‎

मात्र सकाळी साडेसहाच्या सुमारास‎ दाखल केल्यानंतर सायंकाळी सहा‎ वाजता नॉर्मल प्रसूती होणार‎ नसल्याचे सांगत छत्रपती‎ संभाजीनगरला खासगी वाहनाने‎ पाठवले. या रुग्णालयात 108 च्या‎ दोन रुग्णवाहिका आहेत. खासगी‎ वाहनात कोणत्याही वैद्यकीय‎ सुविधा नसल्याने शिवाय‎ वाहनासोबत कर्मचारी अथवा‎ परिचारिका पाठवली नाही, असा‎ आरोप नातेवाइकांनी केला.

हा‎ उपजिल्हा रुग्णालयातील‎ प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे‎ आरोपात म्हटले आहे. गाडी‎ निघाल्यानंतर वीस मिनिटांतच‎ गंगापूरजवळ बाळंतिणीस त्रास सुरू‎ झाला व अखेर रस्त्यातच प्रसूती‎ झाली. मुलीच्या नातेवाइकांनी‎ मुलीची प्रसूती केली हे विशेष.‎ उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय‎ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई‎ करण्याची मागणी नातेवाइकांनी‎ केली आहे‌.‎