आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक व्हिडिओ:ऑटो चालक काढत होता छेड, तरुणीने धावत्या रिक्षातून घेतली उडी; औरंगाबादच्या मोंढा नाका परिसरातील घटना

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीची रिक्षाचालकाडून छेडछाड करण्यात आली. आपला जीव वाचवण्यासाठी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली.

तरुणी रिक्षातून पडल्याचे पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोक तिच्या मदतीसाठी धावले. तरुणीची अवस्था पाहून तिला धीर देत तिच्या कुटुंबियांना बोलावले. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर तरुणीची प्रकृती स्थीर आहे तिला सध्या घरी पाठवण्यात आले. पोलिसांनी नराधम रिक्षाचालकाला अटक केली आहे. 50 वर्षीय आनंद अंबादास पहुंळकर असे या आरोपीचे नाव आहे. हा भाड्याने रिक्षा चालवत होता.

दरम्यान, ही घटना सकाळी पावणे नऊ वाजेदरम्यानची आहे. पण, प्रकरण मीडियात आल्यानंतर पोलिस जागे झाले. माध्यमांवर वृत्त पाहिल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी औरंगाबाद पोलिसांना विचारणा केली. तेव्हाच पोलिस कामाला लागले असे सांगितले जात आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून संताप व्यक्त -

या घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून आता मुलींना घराबाहेर पडायचे की नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीची छेड रिक्षावाला काढतोय.. कुठून मिळतयं हे बळ या विकृतांना पोलिसांची भिती राहिलेली नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे. सुदैवाने मुलगी बचावली आहे. तिच्या तोंडाला मार बसलाय.. औंरगाबादचे पोलीस अॅक्शन मोडमध्ये येण्यासाठी कोणाची वाट पाहत आहेत? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...