आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्लॉटची नोंदणी करुन देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाने 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्लॉटच्या नोंदणीसाठी आरोपीने महिलेला हॉटेलमध्ये नेत पेयामधून गुंगीकारक औषध पाजत तिच्यावर बलात्कार केला होता. शुध्दीवर आल्यावर महिलेने घडलेल्या प्रकाराचा जाब विचारताच आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली होती. आडगाव फाट्यावर ही घटना घडली होती. रामेश्वर ऊर्फ रामभाऊ राहाटे (वय ४२, रा. सुंदरवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
पीडितेची दोनदा फसवणूक
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, कोळघर येथील एक एकर शेती विक्री करायची असल्याचे आरोपीने सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून पीडितेने आरोपीला 5 लाख रुपये दिले. मात्र, काही दिवसांनी आरोपीकडे शेती नसल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्यामुळे पीडितेने पैसे परत करण्यासाठी आरोपीकडे तगादा लावला. त्यावर आरोपीने सुंदरवाडी येथे माझे घर असून ते तुला १५ लाखात विक्री करतो, उर्वरित दहा लाख रुपये दे, असे महिलेला सांगितले. त्यावरदेखील पीडितेने विश्वास ठेवला व आरोपीला गुन्हा दाखल होईपर्यंत १३ लाख ५० हजार रुपये दिले.
महिला दुसऱ्या दिवशी शुद्धीवर
२६ एप्रिल रोजी तुझ्या नावाने घराची रजिस्ट्री करण्यासाठी मोठा साहेब येणार असल्याची बतावणी करुन आरोपीने महिलेा आडगाव फाटा येथील एका हॉटेलवर नेले. तेथे आरोपीने पीडितेला एका रुममध्ये नेत मोठे साहेब येणार आहेत, असे म्हणुन वाट पहाण्याचे सांगुन तिला लस्सी दिली. पीडिता बेशुध्द पडल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच, तिच्या अंगावरील दागिने काढुन नेले. दुसऱ्या दिवशी पीडितेला शुध्द आली. तिने आरोपीला याचा जाब विचारला असता त्याने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी आरोपीकडे गुन्ह्यात दिलेले पैसे आणि गुन्ह्यातील दागिन्यांबाबत तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.