आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून पैसे मिळतात असल्याचे सांगत महिलेला लुटले

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील पलटण भागात ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून पैसे दिले जात असल्याचे सांगत एका महिलेस लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. २०) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील तलाबकट्टा भागातील ओळख रुखमीनाबाई वाबळे ( ६०) ह्या बुधवारी (ता. २०) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील रामलीला मैदानावर खरेदीसाठी आल्या होत्या. त्या एकट्या असल्याचा गैरफायदा घेत दोन अनोळखी भामटे त्यांच्याजवळ आले. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून पैसे मिळत असून तुम्हाला पैसे मिळवून देतो असे सांगत त्यांना सोबत घेतले. त्यानंतर पलटण भागातील एका दवाखान्याच्या बाजूला नेले. यावेळी त्यांनी गळ्यातील दागिने व चांदीच्या पाटल्या काढून ठेवा कारण यामुळे पैसे मिळणार नाहीत असे सांगितले. त्यामुळे रुखमीनाबाई यांनी अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवले. मात्र भामट्यांनी त्यांची पिशवी बदलून घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळानंतर त्यांनी पिशवीमध्ये दागिने पाहिले असता पिशवी बदलल्याचे दिसून आले. त्यामुळे आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यामध्ये चोरट्यांनी चांदीच्या पाटल्या, सोन्याचे सेवन पीस व इतर दागिने तसेच एक हजार रुपये रोख असा ४३ हजार रुपयांचा ऐवज पळवल्याचे तक्रारीत नमूद केले. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अखिल सय्यद, उपनिरीक्षक कांबळे, मनोज पांडे यांच्या पथकाने तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...