आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींना बेड्या:आयुक्तालाच्या दारात महिलेने स्वत:ला पेटवून घेतले; पतीसह चौघांना 6 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेजारील महिलेसह तिचे कुटुंबीय, पती त्रास देतात आणि वाळूज पोलिस त्यांना पाठीशी घालतात, असा आरोप करीत पोलिस आयुक्तालयाच्या दारात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्‍महत्‍या केल्याप्रकरणात पतीसह चौघांना बेगमपुरा पोलिसांनी शनिवारी (3 सप्टेंबर) पहाटे बेड्या ठोकल्या. चारही आरोपींना 6 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी दिले.

आरोपींवर गुन्हा दाखल

पती दिपक मनोहर काळे (42), अशोक तुकाराम शेळके (47), गोकुळ अशोक शेळके (19) आणि संगीता अशोक शेळके (40, सर्व रा. साखेडा मांडवा ता. गंगापुर) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रकरणात नारायण दशरथ गायके या पोलिसावर देखील गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

काय आहे घटना?

मृत सविता दीपक काळे (34) यांचा भाऊ श्‍यामसुंदर विश्‍वनाथ काकडे (36) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, सविताचा 2002 साली दीपक काळे याच्याशी विवाह झाला होता. दीपक हा खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतो. सविता त्याच्यावर नेहमी संशय घ्यायची. त्यातून त्यांच्यात वाद व्हायचे. तसेच, शेजारील महिला संगीता अशोक शेळके, तिचा मुलगा गोकूळ अशोक शेळके आणि पती अशोक शेळके हेदेखील या ना त्या कारणावरून सविताला शिवीगाळ, मारहाण करायचे. शेळके कुटुंबीयांना सविताचा पती दीपक साथ द्यायचा. अशाच प्रकरे एकदा सविताला मारहाण झाली होती, त्‍यावेळी फिर्यादी हे सोडवण्‍यासाठी गेले असता आरोपींना त्‍यांच्‍यावर चाकूने वार केले होते. या एकूण प्रकरणाला कंटाळून सविता व फिर्यादीने तब्बल चारवेळा वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार केलेली आहे. त्यावरून कधी मारहाणीचा गुन्हा दाखल केला तर कधी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केलेली आहे.

दिल्या धमक्या

विशेष म्हणजे तक्रार देण्‍यास पोलिस ठाण्‍यात गेल्यानंतर आरोपी शेळके कुटूंबियांनी पोलिस नारायण गायके हे आमच्‍या ओळखीचे आहे, त्‍यांना तुमच्‍या विरोधात कारवाई करायला लावू अशा धमक्या देत होते. ठाण्‍यात तक्रार करण्‍यासाठी गेल्यानंतर नारायण गायके याने फोन करुन सविता व फिर्यादी यांच्‍यावर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न केला. या नेहमीच्‍या त्रासाला कंटाळून 1 सप्‍टेंबर रोजी सविता यांनी पोलिस आयुक्त कार्यालया समोर स्‍वत:च्‍या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्‍महत्‍या केली. प्रकरणात आरोपी पती दिपक काळे याच्‍यासह आरोपी शेळके कुटूंबीय आणि आरोपींना मदत करणारा पोलीस कर्मचारी नारायण गायके याच्‍या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आत्महत्येस केले प्रवृत्त

अटक आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहाय्यक सराकरी वकील निता किर्तीकर यांनी गुन्‍हा गंभीर असून गुन्‍ह्याचा सखोल तपास करायचा आहे. मृत सविता हिला आत्‍महत्‍येस प्रवृत्त करण्‍यामागे नेमके कारण काय होते, आरोपीच्‍या इतर साथीदारांना अटक करायची आहे. आरोपींचे सीडीआर, एसडीआर तपासयाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...