आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरालगत खटकाळी भागातील प्राचिन विहीरीमध्ये एका महिलेचा मृतदेह सोमवारी (ता. १५) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. महिलेच्या हातावर कापल्याच्या जखमा असून या महिलेचा खून कि आत्महत्या याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. ऐश्वर्या महेश श्रीरामे (२५) असे या महिलेचा नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटकाळी भागातील प्राचिन विहीरीवर आज सकाळी चिखलवाडी भागातील काही गावकरी पाणी भरण्यासाठी गदेले होते. त्यावेळी पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार रवीकांत हरकाळ, अशोक धामणे, गजानन पोकळे यांच्या पथकाना घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहीरीच्या बाहेर काढला. मृतदेहाच्या हातावर कापल्याच्या जखमा आहेत.
दरम्यान, सदर मृतदेह महसुल कॉलनी भागात राहणाऱ्या ऐश्वर्या महेश श्रीरामे यांच्या असल्याचे स्पष्ट झाले. महेश श्रीरामे हे खाजगी वाहन चालवितात. तर त्यांचे सहा वर्षापुर्वीच लग्न झाले होते. त्यांना दोन अपत्य देखील आहेत. रविवारी ता. १४ एेश्वर्या यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे त्या रात्री घरीच होत्या. पहाटे त्या घरातून निघून गेल्या असाव्यात असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. तर ज्या विहीरीत मृतदेह आढळला त्या विहीरीवर रक्ताचे डाग असून विहीरीपासून काही अंतरावरही रक्त सांडलेले आढळून आले आहेत. त्यामुळे हा आत्महत्या का खून याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.