आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा न्यायालयाचा आदेश:औरंगाबादमध्ये महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्यास 20 जूनपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद हळीदकुंकवाच्‍या कार्यक्रमासाठी नातलगाच्‍या घराकडे पायी निघालेल्या महिलेची सोन साखळी हिसकावून धूम ठोकणाऱ्या आणखी एका आरोपीला तब्बल चार म‍हिन्‍यांनी जवाहरनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्‍याला 20 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एल. रामटेके यांनी शनिवारी दिले.

सचिन लक्ष्‍मण टाके (३२, रा. उंदीरगाव ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्‍ह्यात यापूर्वी आरोपी राजेंद्र ऊर्फ पप्‍पु भिमा चव्‍हाण (२८, रा. खटकळी वसाहत, बेलापूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर) याला अटक करण्‍यात आली हेाती.

मयुरबन कॉलनीत राहणार्या पुजा प्रविण हजारे (३९) या १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्‍या सुमारास कैलासनगर येथे राहणार्या नातलगाच्‍या घरी हळदी कुंकवाच्‍या कार्याक्रमासाठी निघाल्या होत्‍या. फिर्यादी या प्रतापनगर शहानुरवाडी मार्गे दर्गा रिक्षास्‍टॅण्‍ड कडे पायीजात असतांना एका वळणावर दर्गाचौकाकडून एका दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने फिर्यादीच्‍या गळ्यातील एक लाख पाच हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून घेत धूम ठोकली. प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी आरोपी विरोधात जवाहरनगरसह संगमनेर, श्रीरामपूर, राहता, तोफखाना, शिर्डी आणि कोपरगाव पोलिस ठाण्‍यात एकूण 16 गुन्‍हे दाखल असल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपीकडून गुन्‍ह्यातील मुद्देमाल आणि गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी जप्‍त करायची आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा देखील तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...