आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाहेर राज्यातून आलेल्या अज्ञात दोन महीलांनी आझाद नगर येथील महिलेस कसलेतरी औषध अंगावर टाकुन सोन्याचे दागीने लुटल्याची घटना दि.6 रोजी घडली असून अज्ञात दोन महिलांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुमिका आनंद साळवे रा.चिंचगव्हाण या त्यांचे माहेर आझाद नगर येथे आलेल्या होत्या.दि 6 रोजी सकाळी त्या आई व काकुशी बोलत असतांना तीन अनोळखी महीलांनी जुन्या वस्तू घेऊन नव्या वस्तू देतो म्हणत भुरळ पाडून कुठल्यातरी गुंगी आणणऱ्या पावडरचा वापर करून भुरळ पाडत त्यांच्याकडील सोन्या चांदीचे तब्बल 39 हजार रुपयांचे दागिने लंपास केले.
हा प्रकार आरोपी महिला फरार झाल्यानंतर कितीतरी वेळाने लक्षात आला.सदर तीन महीलांने त्यांच्या जवळील पांढरे औषध अंगावर टाकल्याने ही भुरळ पडल्याचे सांगत फसवणुक झालेल्या महीलेने शहर पोलीसात अज्ञात तीन महीले विरोध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.