आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध निर्णायक पदांवर आज महिला दिसतात. मात्र, पुरुषांच्या तुलनेत त्यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आजही संघर्षाचा सामना करावाच लागतो. अर्थात, हा संघर्ष त्यांना निराशेत ढकलत नाही, उलट फीनिक्स पक्ष्याप्रमाणे त्या नव्याने भरारी घेतात. हाही काळ बदलणार आहे, त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील, असे आवाहन पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी केले.
लिनेस क्लब ऑफ औरंगाबादच्या वतीने अलकनंदा येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या निवृत्त अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. राजकुमारी गडकर आणि दिव्य मराठीच्या वरिष्ठ पत्रकार रोशनी शिंपी यांना सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. येळीकर म्हणाल्या, अनेक पातळ्यांवर बदल होत आहेत, समानतेची पहाट उगवण्यासाठी संयमाने वाट पाहावी लागणार आहे.
पुरस्कार मरगळ झटकून नव्याने कामाचे बळ देतात आमच्यापैकी प्रत्येकीला संघर्षाचा सामना करावा लागला आहे. लिनेसच्या या पुरस्काराने संघर्षाचा सामना करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली, असे मत कविता नावंदे यांनी व्यक्त केले.
लिनेस ही जाणीवपूवर्क काम करणारी संस्था आपल्या प्रवासासोबतच इतरांच्या आयुष्यातील प्रवास सुखकर करण्यासाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा अनुभव आम्हाला आला. तुम्हा सर्वांचे अनुभव आणि विचार या सामाजिक कार्याला दिशा देणारे होते, असे लिनेसच्या अध्यक्ष अॅड. आशा रसाळ यांनी सांगितले. या वेळी उषा नागपाल, सचिव डॉ. भारती कुलकर्णी, कोषाध्यक्ष राणी छाबडा उपस्थित होत्या. बिना चावला यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.