आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला घडवली अद्दल; महिलेने दाखवले धाडस, जमावाने चांगलेच बदडले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संध्याकाळी घरासमोर फिरणाऱ्या महिलेला पाहून भररस्त्यावर अर्धनग्न होत एका विकृत तरुणाने अश्लील चाळे सुरू केले. हा प्रकार पाहून क्षणभर महिला घाबरली. मात्र, त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करत अद्दल घडवण्यासाठी तिने त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. त्याचा राग आल्याने तरुणाने तिला मारहाण सुरू केली. मात्र, त्याच्या तावडीतून सुटका करून घेत महिला चावी घेऊन पळाली. हा प्रकार कळताच परिसरातील नागरिकांनी अनिल कल्याण तुपे (३६) या रांजणगावच्या विकृत तरुणाला चांगलाच चोप दिला. नंतर सातारा पोलिसांच्या हवालीही केले.

सातारा परिसरातील ३४ वर्षीय महिला स्वत:चा व्यवसाय करते. मंगळवारी संध्याकाळी काम आवरून ती घरासमोर पायी चालत हाेती. तेवढ्यात एक दुचाकीस्वार समोर गेला. काही वेळाने तो परत फिरून आला व त्याने काही अंतरावर दुचाकी उभी केली. काही वेळातच त्याने अश्लील चाळे सुरू केले. अचानक घडलेल्या घटनेने महिला क्षणभर भेदरली. मात्र, पळून गेलो तर त्याची हिंमत अधिक वाढेल हा विचार करत तिने त्याच्या दुचाकीची (एमएच २० बीडब्ल्यू ७२२१) चावी काढून घेतली. मग त्याने चावी घेण्यासाठी महिलेवर हात उगारला. मात्र, तरीही न घाबरता महिलेने त्याच्या तावडीतून सुटका केली व स्वत:च्या घराच्या दिशेने आरडाओरड करत पळत सुटली. तोपर्यंत अनिल तुपे या भामट्याने दुचाकी लोटत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर महिलेच्या कुटुंबासह इतर नागरिकांनी धाव घेत त्याला पकडून चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक अनिता फसाटे यांनी एका दिवसात त्याच्याविरोधात पुरावे, साक्षीदार गोळा करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्यावर न्यायालयाने अनिल तुपे याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...