आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत असून त्यामुळे मृत्यूदेखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे चाळिशीनंतर महिलांनी दरवर्षी तपासणी करावी, असे मत घाटीच्या माजी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने स्तनाचे आरोग्य, सौंदर्य आणि आजार याविषयी जनसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. १० मार्च रोजी आयएमए हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी डॉ. अनघा वरूडकर, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. अरुणा शहा यांनी मार्गदर्शन केले. या चर्चा सत्रामध्ये स्तनाचे सौंदर्य, स्तनपान, आरोग्य आणि कर्करोगाविषयीचे समज व गैरसमज, निदान, उपचार, उपचार कोठे होतो, कशा प्रकारे होतो, उपचारादरम्यान महिलांना स्तन गमावण्याचा धोका असतो का, हा आजार कसा ओळखावा, त्यासाठी मॅमोग्राफी कोणत्या वयात आणि किती वर्षांनी करावी अशा अनेक प्रश्नांवर डॉक्टरांकडून सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रसूतितज्ज्ञांनी करावी तपासणी : येळीकर म्हणाल्या, प्रसूती विभागात महिला आल्यानंतर डॉक्टरांनीदेखील ब्रेस्टची तपासणी करावी. अनेकदा महिला पाळीसह इतर आजारासाठी आल्यानंतर या तपासण्या केल्या पाहिजेत. त्यामुळे लवकर आजार कळला जाईल. स्तनाचा कर्करोग म्हणजे एक किंवा दोन्ही स्तनांमध्ये घातक कर्करोगाच्या पेशींची वाढ. ते अत्यंत घातक आहे. स्तनातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो,अशी माहिती त्यांनी दिली.
जनजागृती होणे गरजेचे येळीकर म्हणाल्या, ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण देशात वाढले आहे. कॅन्सर होऊ नये यासाठी लवकर निदान होणे गरजेचे आहे. पहिल्या स्टेजमध्ये कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. विशेषत: ज्यांच्या घरात नातेवाइकांमध्ये कॅन्सरचे रुग्ण असतील त्यांनी दरवर्षी तपासणी करावी. महिलांनी स्वत: तपासणी करावी. स्तनामध्ये गाठ आढळल्यास डॉक्टरकडे जावे. सोनोग्राफीत निदान होते. अनेकदा महिला अज्ञानापोटी तसेच लाजेपोटी दाखवण्यास टाळाटाळ करतात. परिणामी कॅन्सर वाढत जातो. घरात कुटुंबीयांतील सदस्यांनीदेखील असा त्रास असेल तर ताबडतोब उपचार करणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.