आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांसाठी छळ:विवाहितेची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; आरोपी पतीला 10 जूनपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद फ्लॅट घेण्‍यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घे म्हणत वांरवार होणाऱ्या छळाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने इमारतीच्‍या सहाव्‍या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्‍या केली. हा प्रकार 7 जून रोजी वाल्मीनाका कांचनवाडी परिसरात घडला आहे. प्रकरणात आत्‍महत्‍येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

कुणाला विक्रम देहाडे (20, रा. सहावा मजला, व्‍हीजन सिटी, वाल्‍मी नाका, कांचनवाडी) असे आरोपीचे नाव असून त्‍याला 10 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी शाहिद साजीदुज्जूमॉ यांनी दिले.

प्रकरणात मयत अश्विनी कुणाल देहाडे (19) यांचे वडील संजय अण्‍णा साळवे (42, रा. पिंपळगाव पांढरी ता.जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, 10 फेब्रुवारी रोजी अश्विनी व आरोपी कुणाल देहाडे यांचा विवाह झाला होता. काही दिवस चांगले नांदविल्यानंतर पती कुणाल, सासु माया आणि सासरा विक्रम देहाडे यांनी अश्विनीला फ्लॅट घेण्‍यासाठी माहेरहून १५ लाख रुपये घेवून, अन्‍यथा तुला नांदविणार नाही असे सांगितले. घाबरलेल्या अश्विनीने ही बाब फिर्यादीला सांगितली. फिर्यादीने पैसे जमल्यावर तुम्हाला पैसे देईल असे आरोपींना सांगितले होते, त्‍यानंतरही आरोपींनी पीडितेला शिवीगाळ, मारहाण करित तिचा छळ सुरुच ठेवला. 6 जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्‍या सुमारास अश्‍विनीने फोन करुन 15 लाखांसाठी आरोपींनी तिला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीला सांगितले. तेंव्‍हा फिर्यादीने तिची समजूत काढून सकाळी घरी येतो असे सांगितले.

7 जून रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्‍या सुमारास आरोपी सासरा विक्रम देहाडे याने फोन करुन फिर्यादीला घरी बोलावले. फिर्यादी हे पत्‍नी, मुलगा, भावजयी आणि साडू अशा नातेवाईकांना तेथे घेवून गेले. त्‍यावेळी अश्विनीने आरोपी हे 15 लाखांसाठी छळ करित असल्याचे सांगितले. त्‍यावर फिर्यादी व त्‍यांचे कुटूंबिय आरोपींना समजावून सांगत होते, तरी देखील आरोपी हे 15 लाखांसाठी आडून बसले आणि मुलीला येथून घेवून जा असे म्हणाले. दुपारी दीड वाजेच्‍या सुमारास फिर्यादी हे आरोपी पती, सासु-सासर्याची समजूत काढत होते, त्‍यावेळी अश्विनी बेडरुमध्‍ये पळत गेली आणि तिने बेडरुमचा दरवाजा बंद केला. फिर्यादी व त्‍यांच्‍या कुटूंबियांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून प्रतिसाद न आल्याने त्‍यांनी दरवाजा तोडला, तेंव्‍हा अश्‍विनीने बेडरुमच्‍या गॅलेरीतून उडी घवेून आत्‍महत्‍या केल्याचे निदेर्शनास आले. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

बातम्या आणखी आहेत...