आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत कॅन्सरवर उपचारासाठी ब्रेस्ट क्लिनिक कक्ष सुरू:आठवड्यात सोमवारी आणि बुधवारी दोनदा होणार महिलांची तपासणी

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषत: तीस ते चाळीस वयोगटातल्या महिलांमध्ये हे प्रमाण जास्त वाढत आहे. निदान लवकर न झाल्याने तसेच उपचारांअभावी महिलांना प्राणही गमवावा लागतो. महिलांना उपचार मिळावेत यासाठी घाटीत ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. आठवड्यातून दोन दिवस येथे तपासणी करण्यात येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

ब्रेस्ट कॅन्सर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आढळला तर तो ९० टक्के बरा होतो. सोमवारी आणि बुधवारी ही तपासणी दुपारी बारा ते दोन या काळात करण्यात येणार आहे. याबाबत शल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. सरोजनी जाधव म्हणाल्या की, ‘महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळत आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे उशिराने लक्षात येते. अनेकदा महिला स्तनात गाठ आल्यानंतर ती दाखवण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याचा परिणाम म्हणजे कॅन्सर वाढत जातो. आता येथील ओपीडीमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, डॉ. कैलास झिने, नवजात शिशू विभागप्रमुख एल. एस. देशमुख, उपअधिष्ठाता डॉ. सिराज बेग उपस्थित होते.

घाटीत तपासणीसाठी अत्याधुनिक मशिनरी या वेळी वर्षा रोटे यांनी सांगितले की, घाटीत तपासणीसाठीच्या अत्याधुनिक मशिनरी आहेत. त्यामुळे महिलांनी न घाबरता ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करून घ्यावी. सध्या चाळिशीच्या आत असलेल्या महिलांना मोठ्या प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सर होत आहे.

बातम्या आणखी आहेत...