आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:सभु महाविद्यालयाचा महिला बॅडमिंटन संघ विजयी

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई येथील आर. बी. अट्टल महाविद्यालयात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठअंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या महिला संघाने प्रथम क्रमांक पटकावला. फायनलमध्ये सभुने माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या संघाला २-१ ने पराभूत करत जेतेपद मिळवले. विजेत्या संघात अविष्का पहाडिया व आशी भावे यांचा समावेश होता. या खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख डॉ. विशाल देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल शंकरवार, उपप्रचार्य डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. दीपक कायंदे आणि क्रीडा शिक्षिका डॉ. पूनम राठोड यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...