आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बससेवा:स्मार्ट सिटीची महिला बससेवा अवघ्या महिनाभरात बंद

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डब्ल्यू-२० च्या घाईगडबडीत स्मार्ट सिटीने महिलांसाठी १ फेब्रुवारीपासून औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गावर बससेवा सुरू केली हाेती. मात्र, ९ मार्चला ही बस बंद केली. मुकुंदवाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोवर पहिल्या महिला सिटी बसचे थाटात उद्घाटन झाले होते. पहिल्याच दिवशी अडीचशेपेक्षा अधिक महिलांनी या बसमधून प्रवास केला होता. मात्र, त्यानंतर या मार्गावर प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून शहर बस विभागाने चिकलठाणा ते रांजणगाव या मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र बस वळवली. दिवसभरात पाच फेऱ्या सुरू होत्या. मात्र, अचानक ९ मार्चपासून ही बस बंद केली. गरज पडल्यास महिलांसाठी स्वतंत्र बससेवा पुन्हा सुरू केली जाईल, अशी माहिती स्मार्ट बसचे प्रमुख राम पवनीकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...