आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:सहा लाखांच्या कर्जातून महिला बचत गट व्यवसाय वृद्धी करणार

वाळूज16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांजणगाव शेणपुंजी येथील संत सावता महाराज मंदिरात येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधना केंद्रातर्फे महिला बचत गटाचा मेळावा झाला. कार्यक्रमात बचत गटाच्या सदस्यांना मार्गदर्शन करून त्यांना स्वयंरोजगारासाठी २३ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

रांजणगाव येथील श्री गणेश बचत गटाला ११ लाख, जोगेश्वरीतील दाक्षायणी बचत गट व बोरगावच्या श्री गणेश बचत गटाला ६ लाख रुपये याप्रमाणे एकूण २३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. वाळूज परिसरातील बचत गटांना आयसीआयसीआय बँकेतर्फे २२ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या कर्जाची परतफेड गटांनी केल्याचे संगीता आडसुळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...