आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंस्कृती मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवाची थीम सांस्कृतिक अभिमानाचे सादरीकरण अंतर्गत “किल्ले व कथा” आणि “वंडर केव्हज” महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.
त्याअंतर्गत साहित्य, संस्कृती, कला, पुरातत्त्व आणि इतिहास यांचा समन्वय साधला जात आहे. हा उत्सव म्हणजे देशातील किल्ले आणि लेण्यांमधील आपला समृद्ध इतिहास, संस्कृती, स्वातंत्र्यलढ्याच्या कथा आणि त्यांच्या शूरवीरांना समर्पित केलेली मोहीम आहे.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने वरील थीम अंतर्गत “वंडर केव्हज’ - केव्हज अँड फोर्ट फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे २७ मे २०२३ रोजी वेरूळ लेणी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन केले जाईल. यामध्ये सकाळी ७ ते १० या वेळेत हेरिटेज वॉक, फोटोग्राफी प्रदर्शन व चित्रकला शिबिर आणि सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर यशवंत जाधव व समूह यांचे “पोवाडा गायन”, प्रश्नमंजूषा कार्यक्रम आणि सुप्रसिध्द नृत्यांगना पार्वती दत्ता व महागामी नृत्य समूह यांचा “नृत्यांकन”– एलोरा लेणींच्या वास्तुकला आणि कलाकुसर यावर आधारित नृत्य सादरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे.
मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन आयोजक संचालक प्रा. सुरेश शर्मा आणि पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. शिवकुमार भगत यांनी केले आहे. सहायक अधीक्षक प्रशांत सोनवणे, सहायक संचालक दीपक कुलकर्णी, संवर्धन सहायक राजेश वाकळेकर यांची उपस्थिती होती.
वेरूळ लेणी सुमारे ८०० वर्षांची सर्वात मोठी कला चळवळ म्हणून पाहिली जाऊ शकते. भव्य शिल्पे, चित्रे, वास्तुशिल्पाच्या खुणा हे केवळ कलात्मक चमत्कारच नाहीत तर मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत.
हे नृत्यनाट्य रामायण आणि महाभारतातील दंतकथा कथन करते. ज्याचा अनुवाद कैलास मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या विस्तृत कोरीव काम करतात. याशिवाय दशावतार, गंगा-यमुना-सरस्वती, शिवाच्या जीवनातील भाग, महान सत्यांवरील बुद्धाचे संदेश, वास्तुशिल्पाच्या खुणा आणि ज्ञात-अज्ञात कलाकारांचे स्मरण करणारे नृत्य क्रम आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.