आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोट्यवधींचे लाकडी खेळण्यांचे मार्केट अडगळीत; प्रसिद्धीअभावी प्रगतीची चाके रुतलेली; सावंतवाडीच्या गंजिफाची युराेपात निर्यात; देशात दुर्लक्ष

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: एकनाथ पाठक
  • कॉपी लिंक
  • 100 वर्षांचा माेठा वारसा : लाकडी खेळण्यांचे महाराष्ट्रातील एकमेव मार्केट

चिनी कंपन्यांचा मार्केटमधील बीमाेड करून भारतामधील पारंपरिक खेळण्यांच्या बाजारात भरभराट आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा मानस आहे. ग्रामीण भागातील संस्कृती जपणाऱ्या हस्तकलेच्या खेळण्यांच्या मार्केटला चालना देण्याचे आवाहनही त्यांनी नुकतेच केले. मात्र, महाराष्ट्रातील काेट्यवधींचे सावंतवाडीचे लाकडी खेळण्यांचे मार्केट अडगळीत पडले आहे. जीआय मानांकन आणि अत्याधुनिक स्वरूपातील साेयी-सुविधांच्या अभावाने येथील मार्केटच्या प्रगतीची चाके रुतलेली आहेत.

या मार्केटकडे ग्राहकांनीच पाठ फिरवल्याने स्थानिक कारागिरांना आर्थिक स्वरूपातील फटका बसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या गंजिफाला युराेपात माेठी मागणी आहे. येथील राजघराण्याने ही पारंपरिक खेळाची आेळख कायम ठेवली आहे. मात्र, भारतामध्ये आणि खासकरून महाराष्ट्रात या मार्केटबद्दल प्रचंड उदासीनता निर्माण झालेली आहे.

पारंंपरिक कलेला चालना मिळेना; सुबक, बोलक्या खेळण्यांबद्दल खंत
सुबक आकारातील आणि बाेलक्या स्वरूपातील लाखाे लाकडी खेळणी सावंतवाडीच्या मार्केटमध्ये आहेत. मात्र, याला प्रसिद्धीअभावी जागतिक स्तरावर मार्केट मिळत नाही. यासाठी केलेला प्रयत्नही ताेकडा ठरला. त्यामुळेच लाकडी खेळण्यांच्या कलेला चालना मिळेनाशी झाली आहे. येथील कारागिरांनी अनेक वेळा या उदासीन प्रशासनाबद्दल खंत व्यक्त केली. या खेळण्यांमध्ये भातुकली, शेती मशागतीची खेळणी, प्राण्यांची खेळणी तयार केली जातात.

प्रसिद्धीने मार्केटला आेळख
महाराष्ट्रामध्ये सावंतवाडीतील कारागिरांनी लाकडी खेळण्यांचा वारसा जपून ठेवला आहे. मात्र, याचे स्वरूप वेगात विस्तारले गेलेले नाही. यासाठी त्याला प्रसिद्धीची माेठी गरज आहे. याने जागतिक मार्केटमध्ये या खेळण्यांना माेठी आेळख निर्माण हाेईल. हे सर्वांसाठीच अधिक फायदेशीर ठरेल. -याेगेश प्रभू, अभ्यासक

क्लस्टरचे काम रखडले : पारंपरिक खेळण्यांचा वारसा जपण्यासाठी आणि या हस्तकलेला चालना मिळावी यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात क्लस्टरचे काम हाती घेण्यात आले. यातून सावंतवाडीतील कारागिरांना याेग्य प्रकारच्या साेयी-सुविधा पुरवण्याचा उद्देश हाेता. मात्र, अद्याप याचेही काम रखडलेले आहे.