आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात रविवारी सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत सूर्य चांगलाच तळपला. त्यानंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन त्रिमूर्ती चौक, आकाशवाणी ते बाबा पेट्रोल पंप, शहगंज, पैठण गेट परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर सेव्हन हिल, चिकलठाणा परिसर, सिडको-हडको परिसरात पावसाला हुलकावणी मिळाली. सायंकाळच्या सुमारासही ढग दाटून आले होते. पण मोठ्या पावसाला हुलकावणी मिळाली. दुपारी चार वाजेनंतर अर्ध्या शहरात सरी कोसळल्या तर आकाशवाणी ते चिकलठाणा परिसरात पावसाचा थेंबही पडला नाही. आता २० जूनपासून पावसाचा जोर वाढेल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.