आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम सुरूच राहणार ; डॉ. चौधरी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या विकासकामाची प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाहणी केली. खाम नदीच्या विकासाची गंगा अशीच पुढे नेऊ. त्यासाठी या प्रकल्पाची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी एका स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच, खाम नदीची हद्द निश्‍चित करून त्यात निळी व लाल मार्किंग करावी, असे आदेश डाॅ. चाैधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या कामाची डॉ. चौधरी यांनी शनिवारी पाहणी केली. लोखंडी पूल ते पानचक्कीपर्यंत पाहणी करत त्यांनी सर्व बाबी तपासल्या. त्यात नहर-ए-अंबरी, वॉल पेंटिंग, बटरफ्लाय गार्डन, वृक्ष लागवड, लायटिंग, ओपन जिम, पीचिंग, खोलीकरण, रुंदीकरण, पाणचक्की व हजरत बाबा शाह मुसाफिर यांच्या दर्गाहला भेट देऊन मुसाफिरखान्याची पाहणी केली. आजवर राबवलेला प्रकल्प व प्रस्तावित डीपीआरची त्यांनी माहिती घेत सूचना दिल्या. खाम नदीची हद्द ठरवून घ्या, निळी आणि लाल लाइन निश्‍चित करा, या कामासाठी जलसंपदा (इरिगेशन) व पालिकेच्या नगररचना विभागाची मदत घ्या, नदीला जोडणाऱ्या नाल्यांचे पाणी नदीत येण्यापूर्वी तंत्रज्ञानाचा वापर करून नदीत आले पाहिजे, अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा. यूएनआयए या पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थेने दिलेल्या सल्ल्याचा विचार करावा. खाम नदीच्या विकासकामाबाबत वर्किंग कमिटीची बैठक बोलवा. अशा विविध सूचना केल्या.

एसटीएफ टीमची नेमणूक
खाम नदीच्या विकासकामाचे डिझाइन तयार करा. नदीच्या कामाचे मेंटेनन्स करण्यासाठी एसटीएफ टीमची नेमणूक करून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करा, व्हेरॉक कंपनीकडून अतिरिक्त मनुष्यबळ मागवून घ्या. नदी परिसरात लॉनऐवजी खडी किंवा मुरुमाचा वापर करा. इन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंगचा वापर करून स्टोन पिचिंग करा, अशा सूचना डॉ. चौधरी यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...