आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षकांची भरती करताना मूल्यांकन प्रस्तावासोबत शिक्षक-कर्मचारी यादीची तपासणी करावी, २०१७ ते २०२२ दरम्यानच्या संचमान्यतेची तपासणी करावी, वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीची खातरजमा करावी तरच शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी मुप्टाच्या वतीने करण्यात आली आहे. शनिवारी संस्थापक अध्यक्ष तथा नवनिर्वाचित अधिसभा सदस्य डॉ. शंकर अंभोरे आणि प्राचार्य डॉ. किशोर साळवे यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले की, ‘औरंगाबाद विभागात बहुतांश शैक्षणिक संस्था राजकीय नेत्यांच्या आहेत. शिक्षक भरती करताना शासनाचे नियम डावलून निकटवर्तीयांची भरती करतात. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाणारी भरती प्रक्रिया पारदर्शक असते. पण मागच्या दरवाजाने काही हस्तकांमार्फत संस्थाचालक नियमबाह्य शिक्षकांच्या नियुक्त्या करतात. अशा सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी करावी, अशा मागण्याही निवेदनात केल्या आहेत. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा डॉ. विजय बसाने, डॉ. युवराज धबडगे, अनिल पांडे, डॉ. राहुल तायडे, विलास पांडे, डॉ. बाळासाहेब लिहिणार यांनी दिला आहे.
बदल्यांची चौकशी करा सध्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक घोषित झाली आहे. आता तर आचारसंहिता असतानाही शिक्षक मतदारांना खुश करण्यासाठी निधी गोळा केला जात आहे.हा निधी, वर्तमानपत्रातील जाहिराती, वितरण, बंद तुकड्यांवरील शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांची चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी मुप्टा या संघटनेने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.