आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवस आंदोलनाचा:राज्यात कामगार, सरकारी कर्मचारी, सेवेकरीसंपावर; वाढीव बिलाविरोधात मनसे रस्त्यावर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीज बिल न भरण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

केंद्रातील मोदी सरकारची नवीन आर्थिक धोरणे, शेती व कामगार कायद्यांमधील बदल, सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण या बाबींना विरोध दर्शवण्यासाठी गुरुवारी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. त्याला राज्यातील अनेक शहरांत चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती, अहमदनगर या शहरांत आंदोलन करण्यात आले. दरम्यान, वाढीव वीज बिलांविरोधात मनसेकडूनही राज्यभरात आंदोलन करण्यात आले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन केले आहे.

मनसेचा राज्यभर "झटका मोर्चा’
वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी राज्यभरात “झटका मोर्चा’चे आयोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सरकार गंभीर असेल तर दखल घेईल, अन्यथा सरकारला मनसे आपल्या भाषेत उत्तर देईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला. “पोलिस आपले काम करतात. आम्ही आमचे काम करत आहोत. आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ. त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे. जर त्यांचे सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील अथवा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुढील भूमिका तयार आहे,’ अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. ठाण्यात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी हजाराेंच्या संख्येने मनसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. नाशिक, पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, औरंगाबादसह इतर शहरांत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

चंद्रपुरात ओबीसींच्या मोर्चाने भरवली धडकी
नागपूर| आपल्या मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समाजाने काढलेल्या मोर्चाने रेकाॅर्डब्रेक गर्दीचा विक्रम केला.
अतिशय शिस्तीत निघालेल्या या मोर्च्यात गावखेड्यातून लाखोंच्या संख्येने ओबीसी आले होते. या मोर्चात सर्व राजकीय पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या ओबीसी समाजाला केवळ ११ टक्के आरक्षण आहे, तर गडचिरोलीत ६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे ओबीसी समाजासोबत सरकार अन्याय करीत आहे. ओबीसी समाजाने सरकारला जाब विचारण्याची मागणी या वेळी झाली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser