आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:लाॅकडाऊनमध्येही होणार कामगारांचे पगार; बजाजने घेतला पुढाकार, इतर कंपन्यांचाही सकारात्मक विचार

औरंगाबाद एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमुळे उत्पादन व विक्री ठप्प असतानाही कामगारांसाठी दिलासादायक निर्णय

लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात औरंगाबाद परिसरातील अनेक कंपन्या बंद होत्या. तब्बल ३१ दिवसांनंतर बजाज ऑटोने कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इतर कंपन्याही सुरू झाल्या आहेत. सुमारे ८५० कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेत बजाजचा वाळूज येथील प्लँट सुरू झाला आहे. तथापि, सुमारे तीन हजार कर्मचारी लॉकडाऊन आणि शासनाच्या नियमामुळे कामावर येऊ शकत नाहीत. असे असतानाही बजाज व्यवस्थापनाने कंपनीतील वाळूज प्लँटमध्ये पेरोलवर असणाऱ्या चार हजार कामगारांचा पूर्ण पगार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बजाज व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे आधीच अस्वस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पाठोपाठ कॉस्मो फिल्म, बागला ग्रुप, संकज ग्रुप, रुचा व यासह अनेक कंपन्या कामगारांच्या एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत सकारात्मक विचार करत आहेत.

बजाजसह अनेक कंपन्या पगारात दहा टक्के कपात करण्याच्या विचारात होत्या. मात्र या कठीण परिस्थितीतही बजाजने पुढाकार घेत भारतातील सर्व प्लँटमधील कामगारांचा पूर्ण पगार करण्याचा निर्णय घेतला आहे. सीआयआयचे इझ ऑफ डुइंगचे पश्चिम विभागाचे प्रमुख व बागला ग्रुपचे प्रमुख ऋषी बागला यांनी सांगितले की, बागला ग्रुपमधील सर्व कामगारांचे एप्रिल महिन्याचे पगार होणार आहेत. शासनानेदेखील तशा सूचना दिल्या आहेत. अनेक उद्योजकांना कामगारांचा पगार करायचे आहे. ज्या उद्योजकांना काही अडचण येईल त्यांनी बँकांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

वाळूज एमआयडीसीतील सुमारे ७०० पेक्षा अधिक कंपन्या सुरू

महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीच्या बाहेर असलेल्या उद्योगांना कामकाज सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक उद्योग काही प्रमाणात सुरू झाले आहेत. औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीतील सुमारे ७०० पेक्षा अधिक कंपन्या सध्या काम करत आहेत. लॉकडाऊनमुळे विक्री ठप्प झालेली असताना बहुतांश उद्योजक कामगारांचा हिताचा विचार करीत आहे. कंपन्या बंद असल्या तरी ते कामगारांना पगार देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात दोन लाखांपेक्षा अधिक कामगार काम करतात.

बातम्या आणखी आहेत...