आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक पर्यावरण दिन:औरंगाबाद शहराच्या उष्ण दिवसांत गतवर्षीच्या तुलनेत ८ पटीने घसरण

औरंगाबाद17 दिवसांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • 7 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता

ला निनाच्या प्रभावामुळे यंदाचा उन्हाळा प्रथमच सर्वसामान्य राहिला. २०१८ ते २०२० ही चार वर्षे उष्ण हाेती. त्याला यंदाचे वर्ष अपवाद ठरले असून गतवर्षीच्या तुलनेत ८ पटीने उष्ण दिवस कमी होण्याच्या नव्या विक्रमाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. ग्लोबल वॉर्मिंग दरवर्षी चक्रीवादळ, तिन्ही ऋतूंत पाऊस पडणे, कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाचा थेंब न पडणे असे प्रकार वाढले आहेत. गत चार वर्षांपासून सूर्य आग अाेकत आहे.

त्यामुळे १२० दिवसांपैकी ३४ ते ५४ दिवस पारा ४० ते ४३ अंश दरम्यान उच्चांक पातळीवर राहण्याची व कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १८ दिवस उष्णतेची लाट स्थिर राहण्याची नोंद आहे. मे महिन्यात ला निनामुळे आणि ग्लोबल वाॅर्मिंगमुळे चक्री आणि यास चक्रीवादळाने पाऊस पडला. परिणामी उष्ण दिवस शून्य होण्याची व लाट विरण्याची पहिल्यांदा नोंद झाली. उर्वरित वर्षे बघितली तर मे महिन्यातच सर्वाधिक उष्ण दिवस राहिले.

यंदा पारा केवळ सात दिवस चाळिशीपार
३० एप्रिल४०
२९ एप्रिल४०.१
२८ एप्रिल ४०.६
२७ एप्रिल४०.०
२५ एप्रिल४०.१
७ एप्रिल ४०.१
५ एप्रिल ४०.१

तापमान १ ते ७ अंशांनी कमी
प्रशांत महासागरावरील वारे आपल्याकडे वाहिले. त्यामुळे गत ६० वर्षांतील मे महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस जास्त झाला. औरंगाबादचे तापमान १ ते ७ अंशांनी कमी राहिले. आर्द्रता जास्त राहिली. त्यामुळे उष्ण लाट सक्रिय होऊ शकली नाही. पर्यावरणात बदल दिसून आले. सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी राहिला. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

बारा महिने पाऊस
उत्तर भारतात पश्चिमी विक्षोभामुळे पाऊस व हिमवृष्टी जास्त काळ हाेती, तर ला निनामुळे प्रत्येक महिन्यात पाऊस झाला. ला निनाचा प्रभाव जास्त राहिल्याने यंदाचा उन्हाळा सर्वसामान्य होता. चक्री, यास वादळाने मे महिन्याचा कडक उन्हाळा जाणवला नाही. - वसंत शिंपी, हवामानशास्त्रज्ञ, चिकलठाणा वेधशाळा.

७ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता
केरळात मान्सून दाखल झाला आहे. पुढे हवेचा दाब, आर्द्रता, तापमान पोषक असल्याने नैऋत्य मोसमी पाऊस वेगाने आगेकूच करत आहे. तो आपल्याकडे ७ जूनपर्यंत दाखल होऊन १० जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापून टाकेल, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली.

ला निनामुळे उष्ण दिवसांत घट
गतवर्षापासून प्रशांत महासागराच्या विषुववृत्ताच्या ३.४ विभागावर ला निना परिस्थिती होती. आजही ती कायम आहे. त्यामुळे तापमान कमी राहिले. सूर्यावरील सौर डागांची संख्या कमी आहे. मे महिन्यात ९३ मिमी पाऊस पडण्याची नोंद झाली. - श्रीनिवास औंधकर, खगोलशास्त्रज्ञ, एमजीएम

बातम्या आणखी आहेत...