आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभदंत साधनानंद महाथेरो हे संघराजा डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांचे शिष्य आहे. साधनानंद अरहंत झाले. असे विश्वविख्यात बौद्ध भिक्खु बांगलादेशचे 13 वे संघराजा डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांचे औरंगाबादेत आगमन झाले आहे. 22 जून 2022 रोजी सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर त्यांचे आगमन झाले होते. शनिवारी (25 जून) दुपारी 4 वाजता त्यांची धम्मदेसना आयोजित केली आहे. भानुदासराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. गुरूवारी वेरूळ लेण्यांचे सौंदर्य पाहून त्यांना गहिवरून आले. हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले.
संघराजा डॉ. ज्ञानश्री महाथेरो यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1925 रोजी बांगलादेशात झाला आहे. आज रोजी त्यांचे वय 97 वर्ष आहे. 1944 दरम्यान ते भिक्खु झाले होते. 78 वर्षांपासून ते बांग्लादेशसहित जगभरात बौद्ध धम्म प्रसाराचे काम करत आहेत. संपूर्ण आशिया खंडात त्यांचे प्रवचने होतात. 23 जून 2022 रोजी त्यांनी वेरूळ लेणीला भेट दिली. शुक्रवारी 24 जूनला ते अजिंठा लेणीला भेट देणार आहेत. त्यानंतर 25 जूनला भानूदासराव चव्हाण सभागृहात शहरातील उपासकांसाठी विशेष धम्मदेशना देणार आहेत.
वेरुळ लेणी पाहून गहिवरले
सकाळी त्यांनी वेरूळ लेण्यांचे सौंदर्य न्याहाळले. त्यावेळी त्यांना गहिवरून आले. ते म्हणाले, ‘ इतक्या वर्षानंतरही लेण्यातील सौंदर्य टिकून राहते. ही आपल्या पुर्वजांची किती कमाल आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला हा ऐतिहासिक वारसा पाहता येतो. किती खर्च आला असेल…? याची आपण कल्पना करू शकत नाही. जणू काय आत्ताच बनवले आहे, असे शिल्प येथील भूमीचे वैभव आहे. तथागताने सांगितलेले पंचशील जर सर्वांनी स्विकारले तर विश्वात लष्कर, कारागृहे, पोलिसांंची गरजच पडणार नाही. पंचशील माणसा-माणसांना जोडण्याचे काम करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे कॉलेज सुरू केले. या ठिकाणी येऊन मी खूप भारावून गेलो आहे.’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.