आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिचारिका दिन विशेष:काेराेनाच्या संकटात सर्वाेत्तम सेवा देणाऱ्या शिकाऊ परिचारिकांची मुंबई मनपात थेट नियुक्ती; 20 हजार स्टायपेंड; महापाैर चषकाने करणार गाैरव

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • काेराेनावर मात करण्यासाठी तृतीय वर्षातील 600 शिकाऊ परिचारिकाही कार्यरत

एकनाथ पाठक 

देशासह महाराष्ट्रावर सध्या काेराेनाचे संकट आेढवले आहे. मुंबईमध्येही यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशा भयावह स्थितीमध्येही कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी अविरत सेवा देण्यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय पथक, नर्सेसपाठाेपाठच शिकाऊ परिचारिकांचाही माेठ्या संख्येत सहभाग आहे. त्यामुळे या संकटात  सेवा देणाऱ्या शिकाऊ विद्यार्थिनींच्या कार्याचा मुंबई महानगरपालिका गाैरव करणार आहे. यातील सर्वाेत्तम सेवा देणाऱ्या तृतीय वर्षातील शिकाऊ परिचारिकांना मुंबईच्या महानगरपालिकेतील आराेग्य विभागात थेट नियुक्ती देण्यात येणार आहे. तसेच सेवेबद्दल काहींचा महापाैर चषक देऊन गाैरव केला जाईल.

आयसाेलेशन सेंटर व बाधितांवर उपचार करणाऱ्या सर्वच शिकाऊ परिचारिकांच्या स्टायपेंडमध्येही १२ हजारांची वाढ करण्यात येणार आहे. यातून आता हे ८ वरून २० हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापाैर किशाेरी पेडणेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. यासाठी मनपाच्या विशेष बैठकीत याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल आणि त्यासाठीचे अधिकृत असे परिपत्रकही काढले जाईल, असेही त्यांनी सांगितले. सध्या ६०० शिकाऊ परिचारिका सेवेत आहेत. यात तिसऱ्या वर्षाच्या ३०० विद्यार्थिनींचा समावेश आहे.

संकटाच्या काळात दिलेल्या सेवेचे चीज हाेईल

महाराष्ट्रावर आणि मुंबईवर सध्या काेराेनाचे संकट चालून आहे. याच महामारीला परतवून लावण्यासाठी व थांबलेल्या मुंबईला पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रत्येक जण कार्यरत आहे. यात शिकाऊ परिचारिकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या याच  संकटाच्या काळातील सेवेचे चीज आम्ही करणार आहाेत. - किशाेरी पेडणेकर, महापाैर, मंुबई

संकटाच्या काळातील सेवेचा माेठा अनुभव 

पेडणेकर म्हणाल्या, परिचारिकेचे शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सध्या मुंबईच्या विविध रुग्णांलयात सेवा देत आहे. यामध्ये तिसऱ्या वर्षातील शिक्षण घेत असलेल्या परिचारिकांचा माेठा संख्येत सहभाग आहे. यामधूनच आता सर्वाेत्तम सेवा देणाऱ्या विद्यार्थिनींची आम्ही निवड करणार आहाेत. या सर्वांना मुंबईच्या महानगरपालिकेच्या आराेग्य विभागात नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठीची शैक्षणिक पात्रताही या सर्वांकडे असेल. याशिवाय संकटाच्या काळातील सेवेचाही माेठा अनुभव आता यांना आहे. 

३०० परिचारिका सेवेत; पाच महाविद्यालये 

मुंबईत महामारीला राेखण्यासाठी वैद्यकीय पथक जिवाचे रान करत आहे. यात शिकाऊ नर्सेसही सहभागी आहेत. यामध्ये तृतीय सत्राच्या शिकाऊ नर्सेसची संख्या ३०० असल्याचे दिसून येते. शहरातील पाच नर्सिंग काॅलेजच्या या विद्यार्थिनी आहेत.

बातम्या आणखी आहेत...