आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक योग दिवस:110 वर्षांच्या आजोबांनी घेतला योगासनाचा 'क्लास'; म्हणाले- खेळी-मेळीच्या वातावरणात योगासने शिकविली तर त्यांची आवड मुलांमध्ये निर्माण होते

वेरुळ, वैभव किरगतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेरुळ येथील श्री टाका विद्या मंदिर येथे राहणारे 110 वर्षीय गोपीनाथराव वाघ यांनी लहान मुलांचा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनाचा क्लास घेतला. दरम्यान, गोपीनाथ वाघ हे नियमित योगासने करत असून त्यादिवशी त्यांनी प्रात्यक्षिकांसह योगासने शिकविली. योगासनामुळे आजही त्यांचे आरोग्य ठणठणीत आहे. नियमित योगासने, व्यायाम, सकाळी लवकर उठणे, सकस आणि शाकाहारी आहार यांसारख्या सवयी निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी मुलांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, जर तुम्हाला सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर रहायचे असेल तर 'फास्ट फूड' पासून दूर रहा.

या योग दिनानिमित्त आजोबांनी मुलांना वज्रासन, आकर्ण धनुरासनव, उग्रासन , पश्चिमोत्तानासन , सूर्यनमस्कार, वृक्षासान यांसारखी आसने व प्राणायाम शिकविले. श्री टाका विद्या मंदिरद्वारे शेतकऱ्यांच्या मुलांना शेतामध्ये शिकविले असून लॉक डाऊनमध्ये सुद्धा अनेक मुलांना झाडाखाली बसून शिकविण्याचा उपक्रम श्रीमती गीता वाघ व पुंडलीक वाघ यांनी राबविला आहे. पुरातन भारतीय गुरुकुल परंपरेचे जतन करणारी ही शाळा नियमित अभ्यासक्रमाबरोबर भगवद्गीता, उपनिषदे, रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांचे शिक्षण , योगासने , सूर्यनमस्कार , लाठी-काठी , दांडपट्टा यांसारख्या खेळांचे प्रशिक्षण देते. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम आदीचे प्रशिक्षण व सराव करण्यात आला.

झाडावरील योगासने हा वैशिष्ट्यपूर्ण योगासनांचा प्रकार मुलांनी केला चार वर्षांच्या मुलांपासून सर्व विद्यार्थी झाडांवर वेगवेगळी आसने करतात. खेळी-मेळीच्या वातावरणात योगासने शिकविली तर त्यांची आवड मुलांमध्ये निर्माण होते आणि मग ते स्वतःहून योगसाधना करायला लागतात. त्यामुळे असे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आम्ही करत असतो असे पुंडलिक वाघ यांनी यावेळी सांगितले. सोमवारी झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमास ब्रम्हचारी गजानन बापू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर याप्रसंगी पुंडलीक वाघ व श्रीमती गीता वाघ यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...