आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक योग दिन:चार वारसास्थळांवर साजरा होणार योग दिन; वेरूळला लष्कराचे अधिकारी कुटुंबांसह सहभागी

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने देशभरातील ७५ वारसास्थळांवर योग दिन साजरा करण्यात येणार आहे. यापैकी औरंगाबाद सर्कलमधील त्र्यंबकेश्वर, वेरूळ, दौलताबाद आणि बीबी का मकबरा येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. वेरूळ येथील कैलास लेणीसमोर होणाऱ्या कार्यक्रमात लष्कराचे अधिकारी कुटुंबासह हजेरी लावतील. या ठिकाणी ७५० जण एकाच वेळी योग करणार आहेत, अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे डॉ. प्रशांत सोनोने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. सोनोने म्हणाले, पहिल्यांदाच अशा प्रकारचा सोहळा पुरातत्त्व विभागांच्या स्थळांवर होत आहे. चार विभाग एकत्र येऊन हा कार्यक्रम घेत आहेत. आठवा जागतिक योग दिन साजरा करून योगाचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचणे हा उद्देश आहे. केंद्रीय विद्यालय देशभरातील ७५ ठिकाणी या उपक्रमात सहभागी होत आहे. वारसास्थळांच्या सान्निध्यात केलेल्या योगामुळे लाेक त्याचे सौंदर्य पाहू शकतील, असाही उद्देश आहे. या वेळी केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्य ममता राणी, मुख्याध्यापक प्रकाश वाघमारे, इंडिया टुरिझमच्या सहायक संचालक मालती दत्ता, स्नेहल पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...