आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा क्विंटल फुलांची आरास:कोल्हापूर येथून मागवलेल्या शंभर वनस्पतींच्या अर्काने विश्वंभरांचे पूजन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेड येथील पीठाधिपती सद्गुरू माधवानंद महाराजांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त आयुर्वेदिक वनस्पतीच्या अर्काचा विश्वंभरांना अभिषेक करण्यात आला. या वेळी तीन हजार भक्तांची उपस्थिती होती.महाराजांच्या जिल्ह्यातील सर्व शिष्यवृंदांतर्फे अमृतमहोत्सव सोहळा सप्तपदी मंगल कार्यालयात शुक्रवारी झाला. सकाळी ६० ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पारंपरिक पध्दतीने शतरुद्राभिषेकाला सुरुवात झाली.

या वेळी कोल्हापूरवरून मागवलेल्या १०० प्रकारच्या विविध आयुर्वेदिक वनस्पतीचा अर्क करून १०० कलशाद्वारे अकराशे वेळा अभिषेक करण्यात आला. महाराजांच्या आरोग्यासाठी सपुटीत शतचंडी जपात देवीचा मंत्रोच्चार केला. महामृत्युंजय जप, यजुर्वेद पठण केले. सहा क्विंटल झेंडूच्या फुलांनी आरास केली होती.

बातम्या आणखी आहेत...