आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांचे होणार प्रदर्शन:हर्सूलमधील हरसिद्धी मातेच्या यात्रेनिमित्त रंगणार कुस्ती; दीपोत्सवाने उजळेल परिसर

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने मंगळवारी (८ नोव्हेंबर) हर्सूल येथील हरसिद्धी मातेची यात्रा भरणार आहे. तीन दिवसांच्या यात्रेत कुस्त्यांची दंगल, दुचाकींची स्पर्धा, कोंबड्यांची झुंज असे चित्तथरारक खेळ पाहता येणार आहेत. याखेरीज मुलांसाठी खेळणी, वैविध्यपूर्ण पक्वान्नांची चव चाखता येणार आहे.

हर्सूल गावातील धनगर समाजातर्फे ७ नोव्हेंबरला ११ वाजता मंदिरात रेवड्या उधळून दीपोत्सव केला जाईल. दुपारी २.३० वाजता मराठा समाजाच्या वतीने दीपोत्सव होईल. या वेळी विविध वस्तू विक्रीची दुकाने, लहान मुलांची खेळणी, रहाटपाळणे लावण्यात येणार आहेत. यासोबतच खाद्यपदार्थंाची रेलचेल राहील. संध्याकाळी हरसिद्धी देवीची पालखी चौराहा, अंगुरीबाग येथून निघेल. सुपारी हनुमान, सिटी चौक गांधी पुतळा शहागंज, चेलीपुरा, लेबर कॉलनी, दिल्ली गेटमार्गे हर्सूल येथे पालखी पोहोचेल. मंगळवारी सकाळी ५ वाजता मंदिरावर आरती करून यात्रेला सुरुवात होते.

कुस्त्यांची रोमांचक दंगल : यात्रेच्या पहिल्या दिवशी ८ नोव्हेंबरला ऑर्केस्ट्रा, तर ९ नोव्हेंबरला सकाळी कुस्त्यांची दंगल होणार आहे. यात पुणे येथील काका पवार अर्जुन पुरस्कारप्राप्त गणेश जगताप, आंतरराष्ट्रीय पहिलवान मिर्झा- इराण यांची उपस्थिती राहील. कुस्त्यांसाठी १० रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत बक्षिसे आहेत. शेवटची कुस्ती ७ लाखांची असेल.

घाेड्यांचे देखणे नृत्य
१० नोव्हेंबरला घोड्यांचा नाच, चालीची स्पर्धा होईल. यानंतर बाइक रेस, विविध जनावरांचे प्रदर्शन राहणार असल्याचे पूनमचंद बमणे यांनी सांगितले. भक्तांनी हजेरी लावावी असे आवाहन मंदिराचे विश्वस्त मंडळाचे सचिव संजय हरणे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...