आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश संपादन:वाचण्याजोगे लिहा किंवा लिहिण्याजोगे कार्य करा

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण संत होऊ शकत नाही, परंतु भगवान महावीरांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन श्रावक होऊ शकतो. जे कोणी मोठ्यांपासून शिकवण घेत नाही ते यश संपादन करूच शकत नाही. मृत्यूनंतरही कायम तुमचे नाव अजरामर व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर वाचण्याजोगे लिहा व लिहिण्याजोगे कार्य करा, असा सल्ला राष्ट्रसंत पुलकसागर महाराज यांनी दिला.

राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरात राष्ट्रसंत पुलकसागर महाराज यांच्या सान्निध्यात ३ जुलै ते ३० ऑक्टोबरपर्यंत चातुर्मासामध्ये विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाच्या बातम्या शहरातील अनेक वर्तमानपत्राात प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन हिराचंद कासलीवाल प्रांगणातील आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव सभागृहात झाले या वेळी राष्ट्रसंत पुलकसागर महाराज बोलत होते. या वेळी मुनिश्री पुलकितसागर महाराज, मुनिश्री प्रमुदित सागर महाराज, मुनिश्री प्रणीतसागर महाराज, ऐलक प्रशमितसागर महाराज यांची उपस्थिती होती. या वेळी चातुर्मास कळसदात्यांचा सन्मानही करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...