आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:शिवार ट्रस्टतर्फे लेखिका डॉ. पाटील यांना पुरस्कार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मुंबईच्या कवयित्री, चित्रकार, ललित लेखिका डॉ. मीनाक्षी पाटील यांना रूपाली दुधगावकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, अशी घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर भोंबे यांनी पत्रकार परिषदेत केली.परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. यंदा रूपाली गणेश दुधगावकर स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईच्या डॉ. मीनाक्षी पाटील यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख आहे. येत्या १२ जानेवारीला पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर मुंबई येथे साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत डॉ. विलास पाटील, कैलास अंभुरे, प्रा. श्रीधर कोल्हे, प्रा. अभिजित वाघमारे, संजय शिंदे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...