आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचा घणाघात:​​​​​​​संघाच्या शाखेत चुकीचा इतिहास शिकवला जातो, कोश्यारी भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत चुकीचा इतिहास शिकवला जातो. सुभेदाराची सून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आणली तेव्हा तिचा सन्मान करून महाराज म्हणाले, ‘अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती,’ असे खोटे सांगितले व लिहिले गेले. शाखेत जाणाऱ्या पोरांनीदेखील प्रश्न न विचारताच हे निमुटपणे ऐकून घेतले. कोणत्या मुलाला आपली आई सुंदर वाटणार नाहीॽ त्याच वेळी जर असे सांगणाऱ्यांना ठेचले असते तर राज्यपाल कोश्यारी छत्रपतींबाबत असे बोललेच नसते, असा घणाघात शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. रविवारी रात्री टीव्ही सेंटर मैदानावर महाप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या.

प्रा. अंधारे म्हणाल्या, केंद्रातील भाजप सरकारने आतापर्यंत घेतलेले सगळे निर्णय फेल गेले. नोटबंदी, जीडीपी, जीएसटी हे सगळे निर्णय चुकीचेे घेतले गेले. आतापर्यंत ना महागाईचा प्रश्न सोडवला, ना बेरोजगारीचा प्रश्न सोडवला, ना महिला सुरक्षेचा प्रश्न सोडवला. पण जनतेने उत्तर मागितले की, भावनिक राजकारण करत हिंदू कार्ड जनतेला खेळायला दिले जाते. डोळ्यांना पाणी लावून नमन करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, तर डोळ्यांतले पाणी पुसणे म्हणजे हिंदुत्व आहे. या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार मनीषा कायंदे, विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कोश्यारी भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते : राज्यपाल हे सर्वसमावेशी असावेत. मात्र आपले राज्यपाल भाजपचे पूर्ण वेळ कार्यकर्ते असल्यासारखे वागतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केली, कधी मराठी माणसांना आळशी आणि कामचोर म्हटले. हे सगळे चालू असताना मराठीचा मुद्दा घेऊन लढणारे कुठे गेले, असा सवाल अंधारे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उपस्थित केला.

स्ट्रीट लाइट नसल्यामुळे संदिपानभुमरेंचा विकास दिसत नाही : पैठण मतदारसंघात विकासाचा मागमूस दिसत नाहीत. त्यांच्या मतदारसंघात चाळीस निवेदने ही शौचालयाच्या संदर्भात आलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात काय विकास झाला असेलॽ मी संध्याकाळी आल्यामुळे विकास दिसला नसल्याचे संदिपान भुमरे यांनी सांगितले. मात्र त्यांच्या मतदारसंघात स्ट्रीट लाइट नाहीत. त्यामुळे शहरात अंधारच पडलेला आहे. सिल्लोडची दुरवस्था आहे.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचे धोरण भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्राची बदनामी करण्याचे धोरण आहे. त्यासाठीच त्यांनी कंबोज, सोमय्या, राणा, कंगना रनाैत अशी परप्रांतीयांची फळी तयार केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील मुद्द्यावर भाजप आम्हाला कोंडीत पकडायला बघते. मग सावरकरांवर एवढे प्रेम असेल तर मोदी परदेशी पाहुण्यांना भगूरला का घेऊन जात नाहीत, साबरमती आणि वर्धाच का दाखवतात, असा सवालही अंधारे यांनी केला.

खैरेंनी आधीच भाषण आटोपून घेतले माजी खासदार चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे नेते आहेत, तर सुषमा अंधारे उपनेत्या आहेत. मात्र, अंधारे यांच्या भाषणानंतर आपल्याला कोणी ऐकणार नाही म्हणून खैरे यांनी सुषमा अंधारे यांच्याआधीच भाषण आटोपले.

बातम्या आणखी आहेत...