आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही जाणून घेणे गरजेचे:चाचणी न करता इन्हेलर, कफ सिरप घेणे चुकीचे; न्यूमाेनिया किंवा फुप्फुस विकाराचा धोका

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडीत सर्दी, खाेकल्याची समस्या वाढते. मुले, वृद्धांना सर्दीचा जास्त त्रास हाेताे. त्यामुळे आपल्या इच्छेने काेणताही कफ सिरप , इन्हेलरच्या वापराने होणाऱ्या नुकसानीबद्दल भगवान महावीर रुग्णालयाचे शिशू विभागाचे प्रमुख डाॅ. अमन प्रताप सिंह यांच्याशी चर्चा.

{मुलांना कफ सिरप, इन्हेलर देता येईल का? मुलांना किंवा काेणत्याही वयाेगटातील व्यक्ती सर्दी-पडसे झाल्यावर मनाला वाटेल ते कफ सिरप किंवा गाेळी देऊ नका. आजार समजून न घेता दिलेल्या औषधीचा उपयाेग हाेत नाही. सर्दी-खाेकल्याची इतरही कारणे असू शकतात. कारण समजून न घेता दिलेली औषधी घातक ठरू शकते. हे ठामपणे सांगता येत नसले तरीही त्रास वाढू शकताे. {दीर्घकाळात काय त्रास हाेऊ शकताे? खाेकल्याचे कारण प्रदूषण, संसर्ग किंवा न्यूमाेनिया देखील असू शकताे. अनेकदा दम्यामुळेही खाेकला येताे. म्हणूनच आजाराची क्लिनिकल ओळख हाेणे गरजेचे असते. तसे केले नाही तर आजाराचे गांभीर्य वाढते. दुसऱ्या गुंतागुंतीचीही शक्यता असते. {सिरप प्यायल्याने इतर धाेक्याची शक्यता कशी वाटते? वेगवेगळ्या प्रकारच्या खाेकल्यासाठी वेगवेगळे सिरप आहेत. अनेकदा कफ बाहेर पडणे आवश्यक असते. परंतु अनेकदा कफ आत दबून जाताे आणि खाेकला थांबताे असे सिरप दिले जाते. त्यामुळे फुप्फुसात त्रास हाेऊ शकताे. क्षयराेग असलेल्यांनादेखील खाेकला येत असताे, हे लक्षात ठेवा.

बातम्या आणखी आहेत...