आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरंजन:‘यमाजी भास्कर’ बालनाट्य दहा सादरीकरणांमध्ये प्रथम ; कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामगार कल्याण मंडळाच्या बालनाट्य महोत्सवात विविध दहा नाटकांचे सादरीकरण झाले. यात शिवाजीनगर कल्याण केंद्राने सादर केलेल्या “यमाजी भास्कर’ विनोदी बालनाट्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.ललित कला भवन उस्मानपुरा येथे महोत्सवाच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभ झाला. या वेळी स.भु. नाट्यशास्त्र विभागाचे प्रा. किशोर सिरसाठ, मतीन अहमद बशीर अहमद, श्रावण कोळनूरकर, परीक्षक नागनाथ काजळे, अमिता लेकुरवाळे, रामेश्वर झिंजुर्डे, कामगार कल्याण प्रभारी सहायक आयुक्त मनोज पाटील, कल्याण निरीक्षक विजय अहिरे यांची उपस्थिती होती.

स्पर्धेचा निकाल असा : सर्वोत्कृष्ट संघ : कामगार कल्याण केंद्र, शिवाजीनगर (प्रथम- यमाजी भास्कर), कामगार कल्याण भवन जालना (द्वितीय- दप्तर), कामगार कल्याण उपकेंद्र शहाबाजार (तृतीय- ओसामा), उत्तेजनार्थमध्ये कामगार कल्याण भवन बजाजनगर (झेपावे उत्तरेकडे), कामगार कल्याण भवन उस्मानपुरा (दोन वडे गावाला धडे).

सर्वोत्कृष्ट अभिनय मुले, मुली, दिग्दर्शन : अथांग लिंगडे (प्रथम- दप्तर), आर्यन सोने (द्वितीय- यमाजी भास्कर), राघव सोमाणी (तृतीय- ओसामा) सर्वाेत्कृष्ट अभिनय मुलींमध्ये आध्या चव्हाण (प्रथम- दप्तर), भगवती भांदरगे (द्वितीय- ओसामा), धनश्री दांडेकर (तृतीय- यमाजी भास्कर) तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सारिका कुलकर्णी (प्रथम- यमाजी भास्कर), सतीश लिंगडे (द्वितीय- दप्तर), सुमीत शर्मा(तृतीय- ओसामा).

नाटक काय असते ते लहान मुलांना पहिल्यांदाच कळले वी. र. अत्रे लिखित डॉ. यमाजी भास्कर विनोदी नाटक आहे. आमची दिग्दर्शिका जयंती ठिगळे आणि सहदिग्दर्शिका अपर्णा डबीर यांनी हे नाटक उभं करायला खूप मेहनत घेतली. नाटकातील सगळे बालकलाकार अगदी नवीन होते. नाटक काय असते, त्यांना पहिल्यांदाच कळले. पालकांनीही खूप सहकार्य केले. सारिका कुलकर्णी, संघप्रमुख

बातम्या आणखी आहेत...