आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांची ‘दिवाळी’:वाळूजमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक कारखान्यांत यंत्रपूजन ; हजारोंच्या उपस्थितीत ‘रावण दहन’

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज औद्योगिक परिसरातील ५ हजारपेक्षा अधिक कारखान्यात विजयादशमीनिमित्त यंत्रपूजन करण्यात आले. बहुतांश बड्या कारखान्यांत ४ ऑक्टोबर रोजी पूजा करून कामगारांना सुटी देण्यात आली. लघु व सूक्ष्म लघु कारखान्यांत ५ ऑक्टोबर रोजी यंत्रपूजन झाले. बजाज ऑटो कंपनीच्या कामगारांना २८ हजार ४९० रुपये बोनस मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

रामलीला मैदानावर रावण दहन
अनेक बड्या कारखान्यांनी कामगारांना दसऱ्यानिमित्त सुटी दिली होती. रामलीला मैदान, बजाजनगर येथे हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय तसेच इतर कामगार बांधवांची उपस्थिती होती. मंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. या वेळी माजी महापौैर बापू घडामोडे, माजी जि.प. सदस्य अनिल चोरडिया, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौधरी, नरेंद्रसिंह यादव आदींची उपस्थिती होती. रावण दहनानंतर उपस्थितांनी मोहटादेवी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आपट्याची पाने वाटप करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...