आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान विभाग:राज्यात 3 दिवस पावसाचे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात रविवारपासून सर्वत्र पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २० ते २२ सप्टेंबर या काळात कोकणासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नैऋत्य मध्य प्रदेश तसेच पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र असून कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडील बिकानेर ते पूर्वेकडील दिघापर्यंत सक्रिय आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीय चक्रावात सक्रिय आहे. तेलंगणा ते तामिळनाडू कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती आहे.

२१ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट : कुलाबा वेधशाळेचा २० ते २२ सप्टेंबर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील २१
जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट.
२० सप्टेंबर
: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,पालघर,अमरावती व गोंदियात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
२१ सप्टेंबर : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वाशीम आणि वर्धा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार.
२२ सप्टेंबर : पालघर, ठाणे, मुंबई,रायगड, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

बातम्या आणखी आहेत...