आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिंडी कार्यक्रम:योग संवर्धन संस्थेतर्फे योग दिंडी कार्यक्रम ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

योग दिनानिमित्त योग संवर्धन संस्था, भारतीय योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व २१ जून रोजी योग दिंडी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे उपप्रांतप्रमुख डॉ. उत्तम काळवणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. भानुदास चव्हाण सभागृह, रेल्वेस्टेशन रोड येथून १९ जून रोजी सकाळी ७.३० वाजता रॅली काढण्यात येईल. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, आमदार अंबादास दानवे आदींची उपस्थिती राहणार आहे. बन्सीलालनगर, अहिल्यादेवी होळकर चौक, पदमपुरा मार्गे भानुदास सभागृह येथे रॅलीचा समारोप होईल. २१ जून रोजी सकाळी ६ वाजता टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यानात योग शिबिर होणार आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्रीकांत पत्की यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत गोपाळ कुलकर्णी, चारूलता रोजेकर, संतोष देशमुख आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...