आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिप्रदर्शन:तुम्ही नाना, दादांना बोलवा; आम्ही आदित्य यांना बोलावू,विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनासाठी मविआची तयारी सुरू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुम्ही नाना पटोले आणि तुम्ही अजितदादांना बोलवा. आम्ही आदित्य ठाकरेंना निमंत्रण देऊ,’ अशी चर्चा गुरुवारी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये बैठकीत झाली.

१४ जानेवारीला होणाऱ्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार वर्धापन दिन या सोहळ्यात राजकीय पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाते. विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ होणाऱ्या सभांमध्ये नेते राजकीय भूमिका स्पष्ट करत असतात. आता बदललेल्या राजकीय समीकरणानुसार उद्धवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रित मंच उभा करावा लागणार आहे. त्या दृष्टीने नियोजनासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या क्रांती चौकातील कार्यालयात पहिली आढावा बैठक झाली. त्यात कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याला निमंत्रण देता येईल, यावर चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय झाला नाही. या वेळी आमदार सतीश चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष युसूफ शेख, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...