आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे, परंतु आज सुलभीकरणामुळे उद्योग-व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांतील वेगवान प्रगती पाहता देशातील तरुण उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी व्यक्त केला.
मुक्त पत्रकार दत्ता जोशी यांनी लिहिलेल्या ‘मूव्हिंग अॅस्पिरेशन्स : नेक्स्टजेनच्या २५ परिणामकारक कथा’ या मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात झाले त्या वेळी ते बोलत होते. या पुस्तकात महाराष्ट्राच्या विविध भागांत कौटुंबिक व्यवसायात उतरलेल्या दुसऱ्या पिढीतील २५ युवा उद्योजकांच्या यशोगाथा देण्यात आल्या आहेत. प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ उद्योगपती राम भोगले, काॅन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, सातारा येथील कवित्सू रोबोट्रॉनिकसचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ फडतरे तसेच पुस्तकात नमूद केलेले नव्या पिढीतील युवा उद्योजक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.