आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कुरुंदा येथे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, सततच्या नापीकीचे कारण

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे अल्पभुधारक तरुण शेतकऱ्यांनी सततची नापीकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १९ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुंदा येथील दिलीप खुशालजी काळे (४२) यांना साडेतीन एकर शेत आहे. या शेतातून येणाऱ्या उत्पन्नावर काळे, त्यांची पत्नी व दोन मुले अशा चौघांचा उदरनिर्वाह चालतो. या शेतावर त्यांनी बँकेचे काही पिककर्ज घेतले होते. या शेतात दोन एकर क्षेत्रावर सोयाबीन, अर्धा एकर क्षेत्रावर हळद तर दिड एकर क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. मात्र यावर्षी सतत लागून राहिलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांचे नुकसान झाले. तर हळदीचे पिक खराब झाले असून कापुस देखील खराब झाल्याने वेचणीही हाती आली नाही. या परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह कसा करावा तसेच कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.

दरम्यान, रविवारी ता. १८ सकाळी घरी कोणीही नसल्याचे पाहून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार जोगदंड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी प्रभाकर काळे यांच्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार जोगदंड पुढील तपास करीत आहेत.