आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सतत पाठलाग, व्हॉट्सअॅपवर मेसेजच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सतत पाठलाग, व्हॉट्सअॅपवर मेसेज करून छळ केल्याने रेल्वेस्थानक परिसरातील अदिती दिनेश राठोड (२०) हिने तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या आईने पुराव्यानिशी पोलिसांकडे धाव घेत हेमंत ससाणेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा दाखल केला. धक्कादायक बाब म्हणजे, हेमंतच्या त्रासाला कंटाळलेल्या अदितीने त्याला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केली.

रेल्वेस्थानक परिसरातील अमृतसाई प्लाझामध्ये अदिती आई, वडील व मोठ्या बहिणीसह राहत हाेती. विवेकानंद महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अदितीला हेमंत काही महिन्यांपासून सतत त्रास देत होता. हेमंत व अदितीमध्ये त्यापूर्वी मैत्री होती. मात्र, अदितीने नंतर मैत्री तोडली होती. परंतु, तरीही त्याचे त्रास देणे कमी झाले नव्हते. वारंवार समजून सांगूनही हेमंतचा त्रास कमी होत नव्हता. २ सप्टेंंबर रोजी सायंकाळी ५:१५ वाजता अदितीची आई मोठ‌्या बहिणीला निराला बाजार येथे सोडण्यासाठी गेली होती. यादरम्यान हेमंतने अदितीच्या आई वीणा यांना कॉल केला. काकू, तुम्ही पटकन मानसी दीदीला घरी पाठवा, अदितीने मला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून गळफास घेत ती आत्महत्या करत आहे, असे सांगितले. तेव्हा वीणा या रेल्वेस्थानक पुलाखाली होत्या. त्यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अदितीने गळफास घेतला होता. तिच्या वडिलांनी दरवाजा तोडल्यानंतर ती लटकलेल्या अवस्थेत आढळली.

त्याच्या आई-वडिलांनी विनंती केली, म्हणून तक्रार टाळली अदितीने बोलणे बंद केल्यानंतरही हेमंतचे त्रास देणे कमी होत नव्हते. आठ महिन्यांपूर्वी अदितीने हा प्रकार घरी सांगितला होता. तेव्हा अदितीच्या आई-वडिलांनी हेमंतच्या घरी जाऊन समजावून सांगितले. त्याच्या आई-वडिलांनी आम्ही मुलाला समजावून सांगतो, तुम्ही तक्रार देऊ नका, अशी विनंती केली. मात्र, हेमंतचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे अदितीच्या कुटुंबाने छावणीतील घर सोडून रेल्वेस्थानक परिसरात घर घेतले. मंगळवारी अदितीच्या आईने सातारा पोलिस ठाण्यात निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्याकडे हेमंतविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी संभाजी गोरे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...