आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखाचा गुटखा:स्कूटीवर एक लाखाचा गुटखा घेऊन जाणारा तरुण अटकेत ; रविवारी रोशन गेट परिसरात कारवाई

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुणाला संशय येऊ नये म्हणून स्कूटीवर एक लाख रुपयांचा गुटखा घेऊन जाणाऱ्या शेख इस्माईल शेख फारूक (२३, रा. शरीफ कॉलनी) याला जिन्सी पोलिसांनी अटक केली. रविवारी रोशन गेट परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अनंता तांगडे सहकाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करत असताना एक तरुण स्कूटीवरून सुगंधित पान मसाला, हिरा गुटखा, राज निवास प्रीमियम गुटखा, प्रीमियम एक्सएल ०१ सुगंधित तंबाखू रोशन गेट मार्गे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. इस्माईल दिसताच ताब्यात घेऊन झडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये १,६२,०४० रुपयांचा गुटखा सापडला. हवालदार बी.एस. जगताप, नाईक सुनील जाधव, चव्हाण, सोहेल शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...