आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:तरुणावर शस्त्राने हल्ला; डोक्याला 70 टाके पडले, पुंडलिकनगरातील घटनेत सात ते आठ जणांवर गुन्हा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शुभम विनायक मनगटे (२४, रा. प्लॉट नं. ४६, साईनगर, शिवाजीनगर) याच्यावर शनिवारी रात्री १० वाजता पुंडलिकनगर परिसरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार केलेे. यात तो गंभीर जखमी झाला असून डोक्याला तब्बल ७० टाके पडले आहेत.

शुभमने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राजू पठाडे, यश संजय पाखरे, शुभम मोरे, अतिष मोरे, शेख बादशाह, नीलेश धस आणि त्यांच्यासोबतचे दोन अनोळखी युवक शनिवारी रात्री त्याच्या दुकानावर आले. त्यांनी दोनदा फुकट गुटखा व तंबाखू मागितली. त्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला घराच्या बाजूला रेणुकानगर येथे असलेल्या मोकळ्या जागेवर नेत मारहाण करण्यास सुरुवात केली. कपाळावर दगड मारण्यात आले, पाठीवर चाकूने वार केले. पठाडेने शुभमच्या डोक्यात तलवारीने वार केले. यात तो गंभीर जखमी होऊन रक्तस्राव सुरू झाला. शुभमने जिवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केल्यानंतर परिसरातील नागरिक घराबाहेर आले. तेेव्हा कुणी बाहेर आले तर एकेकाला बघून घेऊ, अशी धमकी आरोपींनी दिली. अखेर शुभमच्या मित्रांनी धाव घेत त्याला परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत रविवारी सकाळपर्यंत चार आरोपींना अटक केली होती. पाचव्या आरोपीला दुपारी ताब्यात घेतले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव खटाणे करत आहेत.

यश, बादशहा दोन दिवसांपूर्वी सुटले : आरोपी यश व बादशहा यांच्यावर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन ते चार दिवसांपूर्वीच पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ जानेवारी रोजी एका लग्नात तलवार घेऊन दोघे नाचत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. तेथून बाहेर पडताच त्यांनी हा गुन्हा केला. या परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

अन्य एका तरुणावर हल्ला
या घटनेला चोवीस तास होत नाहीत तोच भारतनगर येथील ऋषिकेश वंजारे या युवकावर हल्ला झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...