आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो काचेने स्वत:चा गळा कापत होता:तर तरूण व्हिडिओ बनवत होते, दामिनी पथकाने केली मदत, वाळूज परिसरात भर रस्त्यावर थरार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौक परिसरातील सिडको वाळूज महानगर-2, ग्रोथ सेंटर येथे सोमवारी (दि.5 डिसेंबर) रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास एका तरूणाने हातातील काचेच्या तुकड्याने स्वत:च्या गळ्यावर वार करत गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

सदरील घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या तरूणाचे नाव राम बाबुलला बरालिया (28 रा.गुजरात) असे असून सध्या त्याच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्लेखनीयबाब अशी की, उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल झालेला जखमी राम मला जगायचे नाही मला मदत करू नका आसे म्हणत गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली. शहरातून वाळूजमध्ये तसेच नगरच्या दिशेने जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नगर मार्गावरील ग्रोथ सेंटर चौकात कायमच वर्दळ असते. सोमवारी दुपारी आचानक एक तरूण मनाशीच काही तरी पुटपुटत हातातील काचेचा तुकडा स्वत:च्या गळ्यावरून फिरवत असल्याचे दृष्य एका तरूणाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केले.

विशेष म्हणजे संबंधीत तरूण आत्महात्या करण्याच्या उद्देशाने असे करत आसावा याचा आंदाजही व्हिडिओ बनवणाऱ्या तरूणाला आला. मात्र, तरीसुद्धा त्या तरूणाच्या मदतीला जाण्याची माणूसकी किंवा नैतीक कर्तव्य न मानता सदरील घटनेचा व्हिडिओतयार करत तो तात्काळ सोशल मिडीयावर व्हायरल करत सोशल मिडीयातून वाहवा मिळवण्यात त्याला मोठे पणा वाटला. दरम्यान याच मार्गे वाळूजच्या दिशेने जाण्यासाठी निघालेल्या दामिनी पथकाच्या पथकाने त्यांचा वाहन तात्काळ उभे करत रक्तबंभाळ होवून खाली पडलेल्या तरूणाला स्वत:च्या वाहनातून स्थानिक नागरिक व फळ विक्रेते, वाहनधारकांच्या मदतीने उचलून पुढे त्याला घाटी रूग्णालयात रवाना केले. सध्या जखमी राम बरालिया याच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू असून तो वेडसर असल्याचे प्राथमिक चौकशित पुढं आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...