आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी:तलावात पाय घसरून पडल्याने तरूणाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वी अचानक झाला होता बेपत्ता

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धर्मापुरी येथील गायरान जमिनीतील तलावात पाय घसरून पडल्याने २८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २५) उघडकीस आली.मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव अझहर खान पठाण (२८) असे आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तो अचानक बेपत्ता झाला होता. घरातील मंडळी व ग्रामस्थांनी त्याचा इतरत्र शोधाशोध केल्यानंतरही सापडला नाही. त्यानंतर मंगळवारी ग्रामस्थांनी धर्मापुरी शिवारातील गायरान जमिनीतील तलावात पाहिले असता अजहर याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या घटनेची माहिती गावात समजताच चेअरमन नितीन कदम, बालासाहेब कदम, तानाजी कदम, आत्माराम देशमुख, सोनू कदम यांनी घटनास्थळी धाव घेवून अझहरचा मृतदेह दोरीच्या साह्याने तलावाच्या बाहेर काढला. यावेळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर.एस. गायकवाड, बीट जमादार भुसारे, सुहास राठोड उपस्थित होते. दरम्यान, शवविच्छेदन करून ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेबद्दल धर्मापुरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.