आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

क्राइम:वसमतच्या तरुणाचा प्रेमसंबंधातूनच खून, तरुणीसह तिघांवर गुन्हा दाखल

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणाच्या बहिणीने दिली होती पोलिस ठाण्यात तक्रार

वसमत येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका २७ वर्षीय तरुणाचा प्रेमसंबंधातूनच खून झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आता आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूळा येथील सुनील नामदेव साळवे हा मागील दीड ते दोन महिन्यांपासून वसमत येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी कंपनीत रखवालदार म्हणून कामाला होता. मात्र पाच दिवसापूर्वी त्याला कामावरून कमी करण्यात आले होते.

दरम्यान आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याच्या बाजूला आढळून आला. या घटनेची माहिती नागरिकांनी वसमत ग्रामीण पोलिसांना दिली. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, जमादार भुजंग कोकरे, बालाजी मिरासे, राहुल नरवाडे, संदीप सुरोशे, निवृत्ती बडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत सुनील यांच्या मृतदेहाची पाहणी केली असता त्यांचा गळा आवळलेल्या स्थितीत आढळून आला.

गळ्याभोवती दोरी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची नेमकी आत्महत्या का खून हा प्रश्न कायम आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. दमन उत्तरी तपासणीमध्ये सुनील त्याचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.

तरुणाच्या बहिणीने दिली होती पोलिस ठाण्यात तक्रार

मृत सुनील साळवे यांची बहीण सुनीता दुधमल यांनी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये सुनील याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात त्याचा खून केला असल्याचे तक्रारीत नमूद केले. यावरून वसमत ग्रामीण पोलिसांनी राजा लडके, गजानन लडके यांच्यासह एका तरुणीवर खुनाचा गुन्हा दाखल केला.