आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पुसेगाव येथे लग्न करून देण्याच्या कारणावरून तरुणाने केला मावशी अन आजीचा खून, आई गंभीर जखमी; दुहेरी खूनाच्या घटनेने खळबळ

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे लग्न का करून देत नाही या कारणावरून एका तरुणाने आई, मावशी अन आजी याच्या डोक्यात वार केल्याची घटना शनिवारी ता. ८ सकाळी घडली आहे. यामध्ये मावशी व आजीचा मृत्यू झाला असून त्याच्या आईवर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगलाबाई उत्तम बशिरे (४२, रा.परभणी), देवकाबाई किसन पहारे (८५) अशी मयतांची नांवे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील अनुसयाबाई नंदुलाल चऱ्हाटे यांचे पुसेगाव शिवारात शेत आहे. त्या ठिकाणी त्या त्यांची आई देवकाबाई किसन पहारे यांच्या सोबत राहतात. तर त्यांचा मुलगा रोहिदास नंदुलाल चऱ्हाटे हा पुसेगावात राहून एका हॉटेल मध्ये तो काम करतो. दरम्यान, मागील काही दिवसांपासून रोहिदास याने लग्न करून देण्यासाठी त्याची आई अनुसयाबाई यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून तो रागातच होता. त्यातच त्याची मावशी मंगलाबाई उत्तम बशिरे (४२, रा. परभणी) ह्या त्यांची बहिण अनुसयाबाई व आई देवकाबाई यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे त्या तिघीही शेतातील टीनशेडच्या आखाड्यावर राहू लागल्या होत्या.

दरम्यान, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रोहिदास कुऱ्हाड घेऊन आखाड्याकडे गेला. त्याने मागचा पुढचा विचार न करता मावशी मंगलाबाई बशिरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार केल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर कुऱ्हाडीच्या दांड्याचा वार झाल्याने देवकाबाई पहारे ह्या गंभीर जखमी झाल्या तर अनुसयाबाई चऱ्हाटे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार झाल्याने त्या देखील जखमी झाल्या.

त्यानंतर रोहिदास याचा चुलत भाऊ व अन्य तिघे जण शेतात जात असतांना त्यांना हा प्रकार दिसला. तर रोहिदास त्यांच्याही पाठीमागे लागला. त्यामुळे तो पळून गेले. काही वेळानंतर त्यांनी परत घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या देवकाबाई पहारे व अनुसयाबाई चऱ्हाटे यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतांनाच देवकाबाई यांचा मृत्यू झाला. तर अनुसयाबाई यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, नर्सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी, जमादार पोटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी त्याच परिसरात लपून बसलेल्या रोहिदास चऱ्हाटे यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...